एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुनेद मकसूद सय्यद रा. साताररोड, ता. कोरेगाव जि. सातारा यांना सुट्टे पैसे न दिल्याच्या कारणावरून नूर आशरफ आबीद शेख, आरीश आबिद शेख दोघे रा. जगदीश कॉलनी, सातारा आणि दोन अनोळखी इसम (नाव व पत्ता माहित नाही) यांनी लोखंडी रॉड सह लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.