संभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे सातारा तालुक्यातील मुलाशी लग्न लावून दिले. एका महिन्याने मुलीला माहेरी नेले. मात्र, पुन्हा न पाठवून देता तिचे दुसर्याशी लग्न झाले आहे, असे सांगत तब्बल सव्वाचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : संभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे सातारा तालुक्यातील मुलाशी लग्न लावून दिले. एका महिन्याने मुलीला माहेरी नेले. मात्र, पुन्हा न पाठवून देता तिचे दुसर्याशी लग्न झाले आहे, असे सांगत तब्बल सव्वाचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुसावडे, पो. भाटमरळी, ता. सातारा येथील सुनील मानसिंग यादव (वय 32) यांनी याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी वर्षा सुंदरसिंग ठाकूर (रा. तळणी, ता. सिल्लोर, जि. औरंगाबाद), जानवी जयेश सोळंके (रा. सिंडको, मुकुंदवाडी, औरंगाबाद), ताराचंद्र पुंडलिक अधाणी (रा. गणेशनगर, पेरणे, ता. हवेली, जि. पुणे), श्रीकांत शिंदे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
फिर्यादीत नमूद केले आहे की, संबंधित चार संशयितांनी माझा व घरातील लोकांचा विश्वास संपादन करुन एरंडोली, ता. मिरज, जि. सांगली येथील मुलगी लग्नासाठी दाखविली. त्याच दिवशी बैठक घेवून 2 लाखांची मागणी केली. तसेच आजच लग्न करण्यासाठी आग्रह केला. आम्ही लग्नास पसंती दिल्याने दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी नातेवाईकांच्या उपस्थितीत क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील संगम मंगल कार्यालयात लग्नविधी पार पडला.
त्यावेळी संशयितांना फिर्यादींनी दोन लाख रोख रक्कम दिली. तसेच संशयितांनी अडवणूक करत आणखी 60 हजारांची मागणी केली. ही रक्कम दिली तरच मुलीला सोबत घेवू जा, असे सांगितले. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट पध्दतीने 60 हजारांची रक्कमही दिली.
दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी जानवी सोळंके ही भाटमरळी येथे आली. तिने पत्नी वर्षा हिला माहेरी घेवून गिली. त्यावेळी 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिनेही सोबत घेवून गेले. त्यानंतर फिर्यादीने वारंवार विचारणा करत पत्नीला पाठवून देण्याची मागणी केली. त्यावेळी ताराचंद्र अधाणी हिने वर्षा हिने दुसरे लग्न केल्याचे सांगितले. त्याबाबत सर्वांकडे चौकशी केली असता त्यांचे एकमेकांसोबत कोणतेच नाते नसल्याने समजले. सोने-चांदीचे 1 लाख 70 रुपयांचे चांदीचे दागिने, 2 लाख 63 हजारांची रोख रक्कम अशी मिळून 4 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निकम अधिक तपास करत आहेत.