मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा
वडूथ ता.सातारा गावच्या हद्दीत हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : वडूथ ता.सातारा गावच्या हद्दीत हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून सहा जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित साबळे, विजय साबळे, मयुर साबळे, प्रतीक पोतदार, सौरभ साबळे, अभिजीत साबळे (सर्व रा.शिवथर ता.सातारा) यांच्या विरुध्द मंगेश श्रीरंग कदम (वय 46, रा. बसाप्पाचीवाडी ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 5 नोव्हेबर रोजी ही घटना घडली असून लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.