अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर कारवाई
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास रामेश्वर संभाजी शिंदे रा. गलांडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे हा संशयितरित्या स्वतःचा चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने एसटी स्टँड जवळ असणाऱ्या सेव्हन स्टार बिल्डिंगच्या आडोशाला बसलेला आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.