अवैधरित्या दारु वाहतूक प्रकरणी
सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरु असताना बिनधोकपणे दारु वाहतुक करणार्या टोळ्यांवर पोलिसांनी धाड टाकली. तीन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा दारु साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरु असताना बिनधोकपणे दारु वाहतुक करणार्या टोळ्यांवर पोलिसांनी धाड टाकली. तीन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा दारु साठा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शिरवळ, सातारा व पुसेगाव या ठिकाणी करण्यात आली आहे.
अमोल शंकर नलवडे (वय 34, रा. वेळे, ता. वाई), राजेंद्र शंकरराव जावळे (वय 55, रा. पुसेगाव, ता. खटाव), अविनाश अरविंद साळुंखे (वय 39, रा. नागठाणे, ता. सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शिरवळ, सातारा, व पुसेगांव याठिकाणी अवैध दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांचे तीन पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी सापळा लावून तीन वाहने देशी-विदेशी दारुची वाहतुक करीत असताना पकडली. पोलिसांनी वाहनामध्ये पाहणी केली असता त्यामध्ये 1,80,715 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारु होती. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त करुन तिन्ही पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले.
दरम्यान, विधानसभा निवडणुक प्रक्रिया काळात आतापर्यंत अवैध दारु विक्री, वाहतुकीच्या एकूण 16 केसेस करुन 16 लाख 38 हजार 810 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, हसन तडवी, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अजित कर्णे, मोहन पवार, गणेश कापरे, विशाल पवार, सचिन ससाणे यांनी केली.