सातारा शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : सातारा शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार पेठेतील तेल्ली खड्डा येथील आडोशाला हरि निवृत्ती सकटे (वय 42, रा. गुरुवार पेठ) हा जुगार खेळत होता. दि. 18 रोजी सयंकाळी 5.30 वाजता पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी त्याच्यावर कारवाई केली. या प्रकरणी सकटेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.