आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पान टपरी उशीरा सुरु ठेवून त्याबाबत नोटीस दिल्यानंतरही उल्लंघन केल्याप्रकरणी टपरी चालक अमोल बाळासाहेब नलवडे (वय 31, रा. करंजे, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दि. 11 नोव्हेबर रोजी ही कारवाई केली आहे.
चायनीजचे दुकान उशीरा सुरु ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी शशिकांत श्रीधर कुंटीया (वय 40, रा. रविवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दि. 11 नोव्हेबर रोजी पोवई नाका ते कुबेर गणेश मंदीर रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.