मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 20 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रताप सिंह नगर सातारा येथे तेथीलच संजय हरिश्चंद्र वाघमारे यांच्या खिशातून दारू पिण्यासाठी तीन हजार रुपये हिसकावून घेऊन तसेच वाघमारे यांच्या पत्नीच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याप्रकरणी तेथीलच विजय गोरख ओव्हाळ, बाळासाहेब गोरख ओव्हाळ, संजय गोरख ओव्हाळ, धीरज लोंढे, सुरज लोंढे, सीताबाई ओव्हाळ, राजेश ओव्हाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.