संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्या प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्या प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हातात मोबाईल घेवून संशयास्पदरीत्या बसलेल्या बाबू राम अवतारकी (वय 34, रा. चंदनगनर, साातारा) याला मोबाईलच्या मालकीबाबत पोलिसांनी विचारले असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई दि. 9 नोव्हेबर रोजी चंदननगर येथे केली आहे.