शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दीड ते अडीच दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात नसरीन अमीर कुरेशी, अनिस उर्फ अरमान अमीर कुरेशी, आयेशा राशीद सैफी सर्व रा. वारजे, पुणे यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करून एका पोलीस शिपायाला धक्काबुक्की केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस बी मोरे करीत आहेत.