फसवणूक करुन वृध्देचे सव्वालाखांचे सोने लंपास केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : फसवणूक करुन वृध्देचे सव्वालाखांचे सोने लंपास केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस आहे, अशी बतावणी करुन दोन अनोळखी व्यक्तींनी वृध्देचे 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने विश्वास संपादन करुन घेवून गेले. हा प्रकार गोडोलीतील हॉटेल लेक व्ह्यू शेजारील गजराज कॉलनी येथे दि. 17 ऑक्टोबर रोजी घडला. याप्रकरणी विजया शामराम मोहिते (वय 60, रा. गजराज कॉलनी, गोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.