विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परिक्षीत देवे, नम्रता देवे, सोपान देवे (सर्व रा. मुंबई), प्राजक्ता विन्हेरकर, प्रतिक्षा मानके यांच्या विरुध्द सौ. प्राजक्ता परिक्षीत देवे (वय 28, सध्या रा.कोडोली) यांनी तक्रार दिली आहे. 2022 ते 2024 या कालावधीत सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास देवून माहेरहून लाख रुपये आण, असे म्हणून जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.