अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास परळी ता. सातारा गावच्या हद्दीत बौद्ध वस्ती लगत पवन मनोज घाडगे रा. परळी, सातारा हे अवैधरित्या दारू वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून 16,330 किंमतीची दारू आणि एक प्लेजर गाडी जप्त करण्यात आली आहे.