कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस
शेंद्रे, ता. सातारा येथील कणसे ढाब्याच्या समोर उभ्या केलेल्या कारमधून पाच लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरुन नेले. ही घटना दि. 3 रोजी रात्री घडली.
सातारा : शेंद्रे, ता. सातारा येथील कणसे ढाब्याच्या समोर उभ्या केलेल्या कारमधून पाच लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरुन नेले. ही घटना दि. 3 रोजी रात्री घडली. याबाबत कांतिलाल किसन भोसले (वय 48, रा. हवेली, जि. पुणे, मूळ रा. नागझरी, ता. कोरेगाव) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारमध्ये (एमएच 14 जीएस 8120) पर्समध्ये सोन्याची दागिने ठेवले होेते. अज्ञात चोराने मागील दाराची काच फोडून पर्स तसेच दागिने लंपास केले. पोलीस हवालदार निकम तपास करत आहेत.