मलकापूर, तालुका कराड गावच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणार्या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणार्या दहा जणांच्या टोळीच्या सातारा पोलिसांनी केवळ चोवीस तासांत मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामगिरी झाली आहे.
सातारा : मलकापूर, तालुका कराड गावच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणार्या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणार्या दहा जणांच्या टोळीच्या सातारा पोलिसांनी केवळ चोवीस तासांत मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामगिरी झाली आहे. या कारवाईत दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.
आसिफ सलीम शेख राहणार शिंदे गल्ली कराड, सुलताना शकील सय्यद राहणार मंगळवार पेठ करडी पिराजवळ कराड, अजमेर उर्फ अज्जू मोहम्मद मांगलेकर वय 36 राहणार गोळेश्वर कार्वे नाका कराड, नजर मोहम्मद मुल्ला वय 33 राहणार 262 रविवार पेठ कराड, ऋतुराज धनाजी खंडक वय 29 राहणार तांबे तालुका कराड, ऋषिकेश धनाजी खंडक वय 26 राहणार तांबवे तालुका कराड, करीम अजित शेख वय 35 राहणार 192 मंगळवार पेठ कराड, अक्षय अशोक शिंदे वय 29 राहणार तामजाई गल्ली तांबवे तालुका कराड, नजीर बालेखान मुल्ला वय 33 राहणार राजीव नगर सैदापूर कराड, शैलेश शिवाजी घाडगे वय 24 राहणार निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा, अविनाश संजय घाडगे वय 29 राहणार निमसोड तालुका खटाव अशी आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपये, याशिवाय स्विफ्ट इनोव्हा सियाज ही चारचाकी वाहने, याशिवाय दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधितांना 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्याकडून साधारण 11 लाख रुपयांची रक्कम हस्तगत होणे बाकी आहे. ही रक्कम हवाला प्रकरणाची असल्याचे संकेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले असून यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग, आयकर विभाग, जीएसटी डिपार्टमेंट याशिवाय सक्तवसुली संचालनालयाला सुद्धा या प्रकरणाची खबर देण्यात आली आहे. या पैशाची खातरजमा सर्व पातळीवर करण्यात येणार असून या मागील सत्य तातडीने समोर आणणार असल्याचे समीर शेख यांनी सांगितले.
दिनांक 15 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील एका पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम क्रेटा गाडीतून नेली जात असताना कराड गावच्या हद्दीत कोल्हापूर नाक्यावरून कोल्हापूर बाजूकडे जाताना पांढर्या रंगाच्या स्विफ्ट गाडीने पाठलाग करून ढेबेवाडी फाट्याच्या पुढे क्रेटा गाडी अडवली. यानंतर दोन अनोळखी मुलांनी तसेच दोन दुचाकीवरून तीन अनोळखी असेच पाच जण उतरले. यावेळी गाडीची तोडफोड करून संबंधित चालकाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच त्यांच्याकडील सर्व रक्कम काढून घेण्यात आली. संबंधित चालकांचे हातपाय बांधून नांदलापूर तालुका कराड गावच्या आधी त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर फिर्यादींना सरळ तुम्ही कोल्हापूर बाजूने निघून जा, असे सांगून धमकी देणारे पाच अज्ञात इसम तिथून निघून गेले.
याबाबतची तक्रार दाखल होताच कराड शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मोबाईल टॉवर लोकेशन विश्लेषण करून यावरून काही साक्षीदारांची कसून चौकशी केली. यासंदर्भात एका इसमाच्या संदर्भाने तब्बल दहा आरोपींची नावे निष्पन्न झाली. या सर्व आरोपींना पोलिसांनी अवघ्या 24 तासात ताब्यात घेऊन जवळपास 90 टक्के रक्कम हस्तगत केली. यातील एक मास्टरमाईंड ताब्यात आला असून दुसरा मास्टरमाईंड पोलिसांच्या रडारावर आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, कराडचे उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. ए. ताशीलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बधे, फारणे, तारू, भापकर, माळी, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, आबंले, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने, पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे, डिसले, भंडारे, मगदूम, अशोक वाडकर, अमोल साळुंखे, सपना साळुंखे, राजेंद्र गायकवाड, महिला पोलीस हवालदार पुष्पा चव्हाण, पोलीस नाईक अनिल स्वामी, संदीप कुंभार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पोलीस शिपाई संदीप शेडगे, आनंदा जाधव, धीरज कोरडे, महेश शिंदे, अमोल देशमुख, दिग्विजय सांडगे, मोहसीन मोमीन, संग्राम पाटील, सागर भोसले, विजय गुरव, दीपक साळुंखे, आकाश मुळे, अमित चव्हाण, संजय गायकवाड, कपिल आगलावे, शितल गवळी, महिला पोलीस सोनाली पिसाळ, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या कडील शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, अमित माने, मोहन पवार, स्वप्निल दौंड, शिवाजी भिसे, स्वप्निल कुंभार, शिवाजी गुरव, पृथ्वीराज जाधव, पंकज बेचके यांनी सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी या धाडसी कारवाईचे अभिनंदन केले आहे.