वडुथ(ता. सातारा) गावच्या हद्दीत वाठार ते सातारा जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर आयशर ट्रक ने पिकअप ला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
सातारा : वडुथ(ता. सातारा) गावच्या हद्दीत वाठार ते सातारा जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर आयशर ट्रक ने पिकअप ला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवार दि. 15 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वडुथ गावच्या हद्दीत आयशर ट्रक चालक अमोल माणीक कांबळे(वय 30 रा. मोहोळ जि. सोलापूर) याने पिकअप टेम्पोला धडक दिली. या धडकेत टेम्पो चालक विजय नामदेव जगताप(वय 50, रा. कोरेगाव जि. सातारा) व अदित्य विजय जगताप(वय 16) हे जखमी झाले आहेत. या चालकाविरूद्ध विजय यांचे भाऊ दत्तात्रय सदाशिव जगताप यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहेत.