वडूथ येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सातारा : वडूथ येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूथ, ता. सातारा येथील हॉटेल ग्रीनलॉनमध्ये वादावादी, मारहाण झाली. दि. 5 रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा प्रकार घडला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात अमित अशोक साबळे (वय 43, रा. शिवथर, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, सत्यवान आकाश मोकाशी, विकास देशमुख, मंगेश श्रीरंग कदम व अन्य एका अनोळखी व्यक्तीवर (सर्व रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार मंडले तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकारावरुन परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.