मोती चौकातून सोन्याचे दागिने असलेल्या पिशवीची चोरी
मोती चौकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह इतर चीज वस्तू असलेल्या पिशवीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : मोती चौकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह इतर चीज वस्तू असलेल्या पिशवीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजना एकनाथ शिंदे (वय 61, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी सोने खरेदी केल्यानंतर ते पर्समध्ये ठेवले. यामध्ये एकूण 66 हजार 200 रुपयांचे सोन्याचे मणी, चांदीचे पैंजण, मोबाईल, रोख रक्कम याचा समावेश आहे. मात्र मोती चौकातून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना दि. 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे. मात्र कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर उशीरा शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.