विनयभंग आणि मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी वर्ये, ता. सातारा येथील एका कॉलेजच्या कॅन्टीन बाहेर कराड तालुक्यातील एका नगरामध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संवेदन प्रकाश शिवमारे रा. शिराळा, ता. शिराळा जि. सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या तक्रारीत, संवेदन प्रकाश शिवमारे यांना मारहाण केल्याप्रकरणी युवतीसह तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.