सातारा शहरच्या उपनगरातील प्रतापसिंहनगरात मतदान संपताच बुधवारी रात्री सात वाजता दोन तरूणांमध्ये मारामारी झाली. यावेळी काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
सातारा : सातारा शहरच्या उपनगरातील प्रतापसिंहनगरात मतदान संपताच बुधवारी रात्री सात वाजता दोन तरूणांमध्ये मारामारी झाली. यावेळी काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
प्रतापसिंह नगर हे संवेदनशील मतदान केेंद्र असल्यामुळे पोलिसांनी दिवसभर या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु मतदान संपताच रात्री सात वाजता जुन्या भांडणातून दोन तरूणांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये हातापायी झाल्यानंतर तणाव झाला. उपस्थित असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी दोघा तरूणांना ताब्यात घेतले. सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.