सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांसह युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका महिलेच्या घरात घुसून, दारु पिलेल्या मित्राने विनयभंग केल्याचा प्रकार दि. 5 रोजी घडला. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अनिकेत अनिल कुलकर्णी (रा. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार पोळ तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत, सातारा तालुक्यातील एका गावात प्रभाकर विष्णू सावंत याने गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
तिसर्या घटनेत, 20 वर्षीय युवतीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिकासवून, तसेच तू मला आवडतेस, असे बोलत मनास लज्जा उत्पन्न केल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (रा. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.