युवतीच्या विनयभंग प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : युवतीच्या विनयभंग प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका युवतीचे इंस्टाग्राम अकाउंट बनवून अज्ञाताने दि. 5 ऑगस्ट ते 22 नोव्हेंबर दरम्यान संबंधित युवती बाबत त्या अकाउंट वर असभ्य भाषेत मजकूर टाकल्याने अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार साबळे करीत आहेत.