नोटीसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात तक्रार
नगरपालिकेच्या नोटीसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सातारा : नगरपालिकेच्या नोटीसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दि. 12 एप्रिल 2023 ते 8 नोव्हेंबर 2024 दरम्यान मनोज रामचंद्र मोरे आणि योगेश रामचंद्र मोरे दोन्ही रा. दत्त कॉलनी, आंबेदरे रोड, सातारा यांना सातारा नगरपरिषदेने खुल्या जागेमधील अतिक्रमित बांधकाम संदर्भात नोटीस बजावली होती. असे असतानाही संबंधितांनी बजावण्यात आलेल्या नोटिसीचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्यावतीने तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.