जमिनीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपी जेरबंद
काळज तालुका फलटण येथे घराच्या जमिनीच्या वादातून नितीन तकदीर मोहिते वय 40 तालुका फलटण यांचा 14 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री पावणेआठ वाजता अज्ञातांकडून खून झाला होता या प्रकरणांमध्ये लोणंद पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सहा आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.
सातारा : काळज तालुका फलटण येथे घराच्या जमिनीच्या वादातून नितीन तकदीर मोहिते वय 40 तालुका फलटण यांचा 14 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री पावणेआठ वाजता अज्ञातांकडून खून झाला होता या प्रकरणांमध्ये लोणंद पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून सहा आरोपींना ताब्यात घेतले यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी मयत नितीन तकदीर मोहिते यांचे विमल मोहिते यांच्याशी घराच्या जागेवरून फेब्रुवारी 2024 मध्ये वाद झाला होता. त्यावेळी मयत नितीन मोहिते यांनी विमल मोहिते यांना धक्काबुक्की केल्याने त्यांना दवाखान्याचा दहा हजार रुपये खर्च आला होता. हे प्रकरण त्यांनी गाव पातळीवर मीटिंग घेऊन मिटवले होते मात्र विमल मोहिते यांचा मुलगा दीपक महादेव मोहिते यांनी मात्र त्याचा राग मनात ठेवला होता दीपक मोहिते यांचा मुलगा कृष्णा मोहिते वय 22 राहणार शिवाजी पार्क समर्थ नगर नवी सांगवी पुणे आपले साथीदार यश बबन सोनवणे वय18 राहणार हडपसर माळवाडी पुणे, विशाल अशोक फडके वय 20 राहणार नवी सांगवी साई चौक पुणे, ओंकार किशोर खंडाळे वय 19 राहणार पिंपळे गुरव लक्ष्मी नगर पुणे, ऋषिकेश तीर्थराज सकट वय 19 राहणार पिंपळे गुरव लक्ष्मी नगर पुणे आणि अन्य एक विधी संघर्षित बालक यांच्या साह्याने मयत मोहिते यांच्यावर पाळत ठेवली होती .यामध्ये फिर्यादी राजेश मोहिते याचा सुद्धा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता रितेश मोहिते व विधी संघर्षित बालक यांनी नितीन मोहितेच्या हालचाली कृष्णा मोहिते याला फोनवरून दिल्या नितीन मोहिते हा लक्ष्मी देवीच्या मंदिरात मांडवात बसला आहे हे समजतात कृष्णा मोहिते यांच्यासह चौघांनी येथे येऊन नितीन मोहिते यांच्या डोक्यात तोंडावर दोन्ही हातावर पायावर कठीण धारदार शस्त्राने वार केले छातीत सुरा भोसकून गंभीर त्याचा खून केला या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
लोणंद पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान करत या प्रकरणाचा सखोल तपास केला. या आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 27 ऑक्टोबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले आणि त्यांच्या पथकाचे या कारवाई बद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.