सर्पदंशामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सर्पदंशामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरपण गोळा करत असताना राजू सुखदेव भिल्ल (वय 41, रा. अपशिंगे, ता. सातारा, मूळ रा. जि. धुळे) यांना सर्पदंश झाला. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी भोसले यांनी खबर दिली आहे. पोलीस हवालदार म्हेत्रे तपास करत आहेत.