सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 जून 2024 रोजी मारुती सुखदेव गणेशकर रा. रामकुंड, सदर बाजार, सातारा यांची सदर बाजार परिसरातील सुंदरबन हॉटेल समोर पार्क केलेली एक्टिवा दुचाकी क्र. एमएच 11 सीके 5445 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.