जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोन जणांविरोधात कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोन जणांविरोधात कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 रोजी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सातारा एसटी स्टँड शेजारील रस्त्याच्या कडेला दीपक गजानन देशमुख राहणार शनिवार पेठ सातारा हे जुगार घेताना आढळून आले त्यांच्याकडून बाराशे दहा रुपये रोख व जुगाराचे साहित्य अस्तगत करण्यात आले आहे .
दुसर्या घटनेत, जुना मोटर स्टॅन्ड, पान टपरीच्या आडोशास अजय गोरख गायकवाड रा. नामदेववाडी ता. सातारा यांच्याकडून जुगार प्रकरणी 820 रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.