गॅस गिझर चा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
गॅस गिझर चा स्फोट होऊन जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : गॅस गिझर चा स्फोट होऊन जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुलोचना शशिकांत माने रा. केसकर कॉलनी, सातारा या गॅस गिझरच्या स्फोटामध्ये जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.