अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गांजा ओढल्या प्रकरणी पोलिसांनी शशिकांत प्रकाश ननावरे (वय 24, रा. देगाव ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला. एमआयडीसी येथे तो गांजा ओढलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.