दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी देवदत्त भानुदास साळुंखे रा. हमदाबाज, पोस्ट कोंडवे, ता. सातारा यांचा सातारा-मेढा रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.