भांडणे सोडवण्यास गेलेल्यास मारहाण
दोन दुचाकीस्वारांमधील भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकाला लोखंडी गजाने मारहाण झाली. येथील भू-विकास बँक चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सातारा : दोन दुचाकीस्वारांमधील भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकाला लोखंडी गजाने मारहाण झाली. येथील भू-विकास बँक चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंकार संतोष गायकवाड (वय 27, रा. रामनगर, ता. सातारा) यानेे शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, मारहाण करणार्या शिवम दीपक पाटील (रा. देगाव, पाटेश्वर, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार मोहरे तपास करत आहेत.