मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी
मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : मंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील मंगळवार पेठेमधील दत्त मंदिरासमोर लावलेली दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली. दि. 26 ते दि. 27 नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडला. या बाबत रमेश वसंत गवळी (रा. मंगळवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार बाबर तपास करत आहेत.