ट्रक दुचाकीच्या धडकेत वृध्द ठार
वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीतील वेण्णा नदीच्या पुलावर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी झाला आहे.
सातारा : वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीतील वेण्णा नदीच्या पुलावर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात वृद्ध ठार झाला असून, एकजण जखमी झाला आहे.
हा अपघात दि. 15 रोजी रात्री पावणे आठ वाजता झाला. दगडू महादेव नवघणे (वय 67, रा. वासोळे, ता. सातारा) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णा नवघणे व दगडू नवघणे हे सातार्याहून दुचाकीवरून घराकडे निघाले होते. वेण्णा नदीच्या पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने (आरजे 11-जीसी 4839) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेले दगडू नवघणे हे गंभीर जखमी झाले. दगडू नवघणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक नेवसे तपास करीत आहेत.