मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आचारी आकाश क्षत्री यांना का मारले असे विचारण्यास गेले असताना दारुच्या नशेत दोघांनी एकाला मारहाण केली. हा प्रकार येथील मच्छी मार्केट येथे दि. 26 रोजी घडला. या प्रकरणी मयूर संजय सूर्यवंशी (वय 30, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असुन, अरुण रामा खवले, मारुती सर्जेराव जाधव (दोघेही रा. सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक करपे तपास करत आहेत.