आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओमकार नंदू भालेराव राहणार प्रतापसिंह नगर सातारा हा दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार असताना आदेशाचा भंग करून तो प्रतापसिंह नगर परिसरात दि. 31 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आढळून आला. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.