जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्याच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतली. मल्हारपेठेतील रजनी लाईटस येथे दि. 17 रोजी रात्री 8.30 वाजता हा प्रकार घडला. सातारा शहर पोलीस ठाण्यात मनोज शेंडे, शाहबाज पठाण, ऋतुराज शेंडे, सचिन पवार, राहूल माने व दोन अनोखळी असा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. लाईट डेकोरेशन व्यावसायिक रजनीकांत चंद्रकांत नागे (वय 40, रा. मल्हारपेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.