बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सुमारे साडेसहा लाखांची घरफोडी
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 रोजी दुपारी एक ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान गोडोली बॉम्बे रेस्टॉरंट जवळ असणाऱ्या दयानंद सावंत यांच्याकडे भाडेतत्त्वावर असलेल्या माधुरी पोपट जाधव यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी तोडून घरामधील 6 लाख 41 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.