फसवणूक प्रकरणी दोनजणांवर गुन्हा
विश्वास संपादन करुन दुचाकी तसेच 20 हजारांची रक्कम घेवून ती पुन्हा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत.
सातारा : विश्वास संपादन करुन दुचाकी तसेच 20 हजारांची रक्कम घेवून ती पुन्हा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हा प्रकार दि. 24 डिसेंबरला घडला. गंगा नितेश शेळके (वय 20, रा. वनवासवाडी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, रोहित सुरेश राजपुत, अक्षय सुरेश राजपुत (दोघेही रा. कोरेगाव, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस हवालदार भिसे तपास करत आहेत.