तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : तब्बल 41 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2019 ते 2024 दरम्यान महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तुषार विजय साळुंखे रा. कारंडवाडी महाडिक कॉलनी ता. सातारा, त्यांचा भाऊ जयवंत विजय साळुंखे, वडील विजय साळुंखे तसेच मोठा भाऊ सचिन साळुंखे यांच्याकडून ऑनलाइन, आरटीजीएस, कॅश स्वरूपात 41 लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी पार्थ केशवराव राऊत रा. मधुबन कॉलनी, जुनी सांगवी, पुणे आणि राजेंद्र दत्तात्रय होळकर रा. खडकी, पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.