रस्त्याच्या वादाच्या कारणातून आठ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : रस्त्याच्या वादाच्या कारणातून आठ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडू कोळपे, शामराव कोळपे, सोमनाथ कोळपे, सुरज कोळपे, अक्षय कोळपे (सर्व रा. खेड, सहकारनगर, सातारा) यांच्या विरुध्द उपेंद्र राजेंद्र पवार (वय 43, रा. संगमनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 18 ऑक्टोबर रोजी खेड येथे घडली आहे. लाकडी दांडक्याने मारहाण करत मोबाईलसह सोन्याचा दागिने काढून घेतला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.