बाजूला सर म्हणाल्याचा राग धरुन पाच जणांनी युवकास मारहाण केली. हा प्रकार दि. 2 रोजी नवीन एमआयडीसीतील आदिती हॉटेलजवळ घडला.
सातारा : बाजूला सर म्हणाल्याचा राग धरुन पाच जणांनी युवकास मारहाण केली. हा प्रकार दि. 2 रोजी नवीन एमआयडीसीतील आदिती हॉटेलजवळ घडला. या प्रकरणी निखिल दिलीप जाधव (वय 32, रा. देगाव रस्ता, कोडोली, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, विजय विश्वास साळुंखे, प्रशांत मोहन साळुंखे, पंकज बजरंग साळुंखे, प्रशांत साळुंखे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच या घटनेत जाधव बेशुध्द झाला होता. त्याला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी डमीट करण्यात आले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन आढळून आली नाही. पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत.