महिलेस मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
महिलेसह तिच्या दिराला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : महिलेसह तिच्या दिराला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर, सातारा येथील एका महिलेस आणि तिच्या दिरास मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच सर्जेराव कांबळे उर्फ छोट्या, मनोज महादेव अवघडे, आदित्य उकिर्डे, सौदागर खुडे, अमर भवाळ, बायडाबाई खुडे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.