अवैधरित्या दारु विक्रीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका वृद्धेवर कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरित्या दारु विक्रीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका वृद्धेवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील अजंठा चौकातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला हिराबाई राजाराम निंबाळकर (वय 62, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) ही अवैधरित्या दारुविक्री करत होती. दि. 18 रोजी पोलीस शिपाई सुशांत कदम यांनी कारवाई केली. तिच्याकडून गावठी हातभट्टीची 7 हजार रुपयांची 70 लिटर दारु जप्त केली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.