शाहूपुरीत चैन स्नॅचिंग; दोन अज्ञातांवर गुन्हा
शाहूपुरी परिसरात चैन स्नॅचिंग केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : शाहूपुरी परिसरात चैन स्नॅचिंग केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मदन हरिभाऊ पिसे रा. शाहूपुरी, सातारा हे सकाळी फिरायला जात असताना पाठीमागून बुलेट सारख्या मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून, तोडून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.