जिहे येथे सुमारे दीड लाखांची घरफोडी
जिहे येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : जिहे येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान राजश्री अरविंद फडतरे मूळ रा. जिहे, ता. सातारा सध्या रा. पनवेल, नवी मुंबई, जि. रायगड यांच्या जिहे येथील राहत्या घराच्या खिडकीच्या स्लाइडिंग विंडोची लोखंडी जाळी कशाने तरी कापून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे तीन तोळे वजनाचे, एक लाख साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरफोडी करून चोरून नेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.