विवाहितेची फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकाच महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. ही घटना 2019 पासून घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी गोडोली व नांदगाव ता.सातारा येथील आहेत.
सातारा : विवाहितेची फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एकाच महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. ही घटना 2019 पासून घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित आरोपी गोडोली व नांदगाव ता.सातारा येथील आहेत.
अनिकेत अशोक पिसाळ (रा.गोडोली, सातारा) व हर्षल भास्करराव चव्हाण (मूळ रा.नांदगाव ता.सातारा सध्या रा. स्वराजनगर, गोडोली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला ही सोशल मिडीयावरील फेसबुक अकाउंट वापरत आहे. यावरुनच डिसेंबर 2019 मध्ये अनिकेत पिसाळ याने महिलेशी फेसबुकवरुन ओळख वाढवली व त्याने महिलेचा मोबाईल नंतर घेतला. यातूनच अनिकेत संपर्कात आला व फोन करुन तो महिलेच्या घरी गेला. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने महिलेच्या इच्छेविरुध्द अत्याचार केला. या घटनेनंतर त्याने ’महिन्यातून एकदा भेटायचे नाहीतर शारीरीक संबंधाविषयी तुझ्या पतीला सांगेन,’ अशी धमकी दिली. यामुळे महिला घाबरली व तिने कोणाला याबाबतची माहिती सांगितली नाही.
दरम्यान, य घटनेनंतर फेसबुकवरुन हर्षल चव्हाण याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यानेही महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्याने भेटायला बोलावून अनिकेत पिसाळ याच्याबाबतची घटना विचारली. यावेळी त्याने ’त्या प्रकरणातून बाहेर काढतो’, असे सांगून महिलेशी जवळीक वाढवली. यातूनच त्याने धमकी देत महिलेवर हॉटेल प्राईड येथे अत्याचार केला. या घटनेनंतर अनिकेत पिसाळ याला ही बाब समजल्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व घटनेने महिला घाबरली व तिने घडलेल्या घटनेची माहिती पतीला दिली. त्यावरुन त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात जावून दोघांविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.