दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील न्यायालयाच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून (एमएच 11 डीके 4243) दीड लाख रुपयांची रक्कम अज्ञाताने चोरी केली. दि. 17 रोजी सकाळी 11 ते 11.30 या दरम्यान ही घटना घडली. या बाबत किरण रघुनाथ शेडगे (वय 47, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सावंत तपास करत आहेत.