विलासपुरात 20 हजारांची घरफोडी
विलासपुरमध्ये अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : विलासपुरमध्ये अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलासपुरातील कारंजकर नगर येथे घरफोडी झाली. त्यात अज्ञाताने 20 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. हा प्रकार दि. 27 रोजी घडला. या प्रकणी महेशकुमार पुंडलिक जाधव (वय 62, रा. कारंजकरनगर, विलासपूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.