घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हातउसने घेतलेले पैसे देत नसल्याच्या कारणातून घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी देवेंद्र ढोणे व प्रतीक नलवडे यांच्यासह अनोळखी दोघे (दोघे रा. ढोणे कॉलनी, बोगदा, सातारा) यांच्या विरुध्द शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शौकत जैनुद्दीन बागवान (वय 57, रा.मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 28 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. तक्रारदार यांच्या मुलाने हात उसने पैसे घेतल्याने व ते पैसे परत करत नसल्याने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.