येथील अजंठा चौकात दारु विक्री करत असलेल्या हिराबाई राजाराम निंबाळकर (वय 62, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) हिच्यावर दि. 6 रोजी पोलीस शिपाई सागर गायकवाड यांनी कारवाई केली.
सातारा : येथील अजंठा चौकात दारु विक्री करत असलेल्या हिराबाई राजाराम निंबाळकर (वय 62, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) हिच्यावर दि. 6 रोजी पोलीस शिपाई सागर गायकवाड यांनी कारवाई केली. तिच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच, अपशिंगे, ता. सातारा अवैध दारुविक्री केल्याप्रकरणी नाना महादेव मसुगडे (वय 55, रा. अपशिंगे) याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव यांनी कारवाई केली.
मालगाव, ता. सातारा येथे समीर नजीर मुलाणी (वय 47, रा. मालगाव) हा दारुविक्री करताना आढळला. त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव यांनी कारवाई केली असून, सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.